ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पाठविले ‘बंगाली आंबे’ जाणून घ्या त्यामागील कारण…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- राजकारणात कोणी कोणाचा फार काळ जसा मित्र नसतो, तसाच तो फार काळ शत्रूही राहत नाही, असे म्हटले जाते.

राजकारणात काहीही अशक्य नसते, हे आजपर्यंत राज्यासह देशात घडलेल्या राजकीय घडामोडींवरून अनेकदा स्पष्ट झाले आहे. याचाच प्रत्यय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संबंधांबाबत येऊ लागला आहे.

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं आता काहीशा नरमल्याचे दिसत आहे. ममतांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालमधील सर्वाधिक गोड असलेले आंबे पाठविले आहेत.

राजकारणातील कटूता दूर करण्यासाठी नेत्यांकडून अशा प्रकारे आंबे पाठविण्याची परंपरा आहे. ममतांनी पंतप्रधान मोदींना हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग हे आंबे पाठविले आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय ममतांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद,

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आंबे पाठविले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24