ताज्या बातम्या

साकीनाका बलात्कार प्रकरणातील नराधमाला फाशी

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra news : मुंबईतील साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला फाशीची शिक्षा दिली आहे.

त्याने ३४ वर्षीय महिलेवर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनात बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही घटना घडली होती. चिडलेल्या आरोपीने बलात्कार झाल्यावर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकला.

त्यानंतर तिला रक्तबंबळ अवस्थेत सोडून पळ काढला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला. घटनेनंतर जलदगतीने तपास करत पोलिसांनी १८ दिवसांत आरोपपत्र दाखल केले.

दिंडोशी न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने आज अंतिम निकाल दिला असून आरोपी चौहान याला फाशीची शिक्षा दिली आहे. आठ महिन्यांत या खटल्याचे कामकाज पूर्ण होऊन अंतिम निकाल आला आहे.

Ahmednagarlive24 Office