मानलं इंजिनियर साहेब!! इंजिनियरची नोकरी सोडली अन गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प उभारला; आज करतोय लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

succes story : भारत हा जरी कृषिप्रधान देश (Agriculture Country) असला तरी देखील येथील नवयुवक शेतकरी पुत्र उच्च शिक्षण घेऊन नोकरी करण्याचे स्वप्न बघत असतात. शेतकरी बांधव (Farmers) देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घ्यावे चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करावे आणि आपले जीवनमान उंचवावे हेच स्वप्न बघत असतात.

हरियाणा मधील एका नवयुवक शेतकरी पुत्राने देखील कंप्यूटर इंजीनियरिंगचे उच्च शिक्षण घेतले आणि चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत तगड्या पगाराची नोकरी देखील केली. मात्र नोकरीत काही मनरमला नाही आणि मग काय या नवयुवकाने गांडूळ खतनिर्मितीचा प्रकल्प (Earthworm composting project) उभारला आणि आता हा अवलिया यातून लाखो रुपयांची कमाई करत आहे.

हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात राहणाऱ्या निर्मल सिंग सिद्धू या इंजिनीयरने गांडूळ खत निर्मितीतुन (Vermicompost) लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे. मित्रांनो खरे पाहता निर्मल शेतकरी कुटुंबात जन्माला आलेत यामुळे अगदी लहानपणापासून शेती व्यवसायाशी त्यांची चांगली जवळीक आहे.

निर्मल यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले कम्प्युटर इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी तब्बल तीन वर्ष एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देखील केली. मात्र आता तो गांडूळ खताचा व्यवसाय करत आहे. दोन वर्षांपूर्वी कर्नाल येथून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय हळूहळू आता देशभर पसरत आहे.

सध्या यातून तो दरमहा एक लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहे. मित्रांनो निर्मल 33 वर्षाचे आहेत. निर्मल सांगतात की, इंजिनीअरिंगनंतर काही वर्षे नोकरी केली, पण हवी तशी नोकरी काही मिळाली नाही. मग काय कौटुंबिक पार्श्वभूमी शेतीची असल्याने त्यांनी शेती व्यवसायातच आपले करियर घडविण्याचे ठरवले.

या अनुषंगाने त्यांनी शेती व्यवसायाची जोड धरली आणि इकडे तिकडे भटकण्यापेक्षा स्वतःची शेती सांभाळणे कधीही फायदेशीर ठरेल असा विचार केला. त्यांनी त्यानंतर सलग तीन-चार वर्षे शेती केली. मात्र, शेतीमध्ये देखील त्यांना अपेक्षित असा नफा मिळाला नाही.

यानंतर मात्र निर्मल यांनी निराश होऊन शेती व्यवसायाला राम राम ठोकला आणि कॉर्पोरेट क्षेत्राकडे वळले. 2016 च्या दरम्यान निर्मल यांना पुन्हा एका प्रतिष्ठित मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली.

यावेळी त्यांना चांगला पगार देखील मिळाला होता, पण थोड्या कालावधीनंतर या नोकरी मध्ये देखील त्यांना कंटाळा येऊ लागला. खरं पाहता निर्मल यांना स्वतः काहीतरी नवीन आणि जरा हटके सुरू करायचं होतं. मग काय पुन्हा एकदा निर्मल यांनी 2019 मध्ये नोकरी सोडली आणि आपल्या गावी परतले.

गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प उभारला
गावी परतल्यानंतर निर्मल यांना वर्मी कंपोस्ट अर्थात गांडूळ खत निर्मितीची माहिती मिळाली. सुरुवातीला गांडूळ खत निर्मिती बद्दल जाणुन घेण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला, इंटरनेटच्या माध्यमातून वर्मी कंपोस्ट तयार करण्याबाबत माहितीची जमवाजमव केली.

यानंतर त्यांनी मेरठमधील एका शेतकऱ्याकडून गांडुळे विकत घेतली आणि दोन-चार बेड्सने त्याची सुरुवात केली. काही महिन्यांतच या व्यवसायातून त्यांना चांगले पैसे मिळू लागले. सुरुवातीला मिळालेल्या या यशामुळे गदगद झालेले निर्मल यांनी गांडूळ खत निर्मितीच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने काम देखील सुरु केले.

सध्या निर्मल यांच्याकडे सुमारे 200 बेड असून त्यापासून ते दरवर्षी 400 क्विंटलहून अधिक गांडूळखत तयार करत आहेत. निर्मल गांडूळ खत हरियाणा तसेच इतर राज्यांत विक्रीसाठी पाठवत आहेत. विशेष म्हणजे मार्केटिंगसाठी ते सोशल मीडियाचा देखील वापर करीत आहेत.

अनेकजण त्यांच्याकडून ऑनलाइन माध्यमातूनही गांडूळ खत विकत घेत आहेत. खतासोबतच तो गांडुळांचा व्यवसायही करत आहे. यातून त्यांना चांगले पैसेही मिळत आहेत. निश्चितच निर्मल यांनी मिळवलेले हे नेत्रदीपक यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे सिद्ध होत आहे.