भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मंगेश शिंदे पाटील यांची निवड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील युवा कार्यकर्ते,ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक तसेच दक्षिणेचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे मंगेश आप्पासाहेब शिंदे पाटील यांची अहमदनगर जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली,जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे यांनी निवडीचे तसे पत्र दिले.

मंगेश शिंदे पाटील हे संगमनेर तालुक्यातील एक सक्षम उद्योजक,तसेच अभ्यासू,आक्रमक,आणि विश्वासू युवा नेतृत्व म्हणून प्रचलित आहेत,त्यांच्या दोन पिढ्या राजकारण आणि समाजकारणात सक्रिय होत्या आता तोच वारसा ते पुढे चालवत आहे,शेतकरी,युवक, विध्यार्थी यांच्या प्रश्नांना वाचा फोडून अनेकदा त्यांनी आवाज उठवून त्यांना न्याय मिळून दिला आहे,

गेली अनेक दिवसाच्या या समाजकारणात त्यांच्या पाठीशी असंख्य युवक कार्यकर्त्यांची एक फळी तयार झाली आहे,अनेक युवकांना संघटित करून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत तसेच युवकांना स्वावलंबी बनवन्याच्या उद्देशाने आपल्या व्यावसायिक मार्गदर्शनातून अनेकांना एक वेगळी दिशा देऊन वाट निर्माण करून दिली आहे ,

नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदर डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे निकटवर्तीय तसेच युवकांमध्ये “खऱ्या मैत्रीचं दुसरं नाव-मंगेश शिंदे” म्हणून ते सर्वत्र तालुक्यात प्रचलित आहे,त्यांच्या निवडीनंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले, यावेळी ना.राधाकृष्ण विखे पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील,

शालिनीताई विखे पाटील,जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,नितीन दिनकर,तालुकाध्यक्ष अशोकराव इथापे,सतीशराव कानवडे,श्रीराम गणपुले,सुनीलशेठ जाधव, राहुल शिंदे,रणजित हासे,प्रतीक खेडकर,अमोल ठोंबरे,मनोज पारखे,संतोष रोहम,शांताराम शिंदे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24