file photo

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  बारामतीत कर्करोग बरा करण्याचा दावा करत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. तर सोलापुरात आश्रमात येणाऱ्या एका महिला शिष्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा मनोहर भोसलेवर दाखल करण्यात आला होता.

मनोहर भोसले सध्या पोलिसांच्या ताब्यात असला तरी, मनोहर पासून सद्गुरू मनोहर मामा होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास आश्चर्य वाटायला लावणारा आहे. बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात १० सप्टेबरपासून पोलिस कोठडीत असलेल्या मनोहर भोसले (वय २९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याची बारामती न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

दरम्यान, या गुन्ह्यातील मनोहर भोसले याचा सहकारी ओंकार शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. या गुन्ह्यातील विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा हा अद्याप फरार आहे. मनोहर भोसले याला एका बलात्कार प्रकरणात सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

बारामती पोलिसांकडून करमाळा पोलिसांनी भोसलेला ताब्यात घेऊन, बलात्काराच्या गुन्ह्यात त्याला रविवारी अटक केली. बारामती आणि करमाळा पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता. ९) एकाच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे बारामती आणि करमाळा पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते.

अखेर साताऱ्यातून भोसलेला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर बारामती न्यायालयाने भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका मालिकेत काम देतो, असे खोटे आमिष देत पीडितेवर अत्याचार करण्यात आला असा आरोप मनोहर मामावर आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दहा दिवसांची मुदत मागितली होती. या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहेत. बारामतीतील शशिकांत सुभाष खऱात याच्या वडीलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले व त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीच्या वडिलांचा कर्करोग बरा करतो, असे सांगत जिविताची भिती घालत २ लाख ५१ हजार रुपये घेतले.

पैसे परत मागितले असता जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा बारामती तालुका पोलिसात दाखल आहे. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.