‘हा’ निर्णय घेतला तरच अयोध्येला जाणार, मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Manoj Jarange Patil : आज 22 जानेवारी 2024 ला श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. आजपासून हे मंदिर राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहे. यामुळे आता येथे हजारोंच्या संख्येने रामभक्त दररोज दर्शनासाठी दाखल होणार आहेत.

तथापि आज सर्वसामान्यांना मंदिरात दर्शन घेता येणार नाहीये. उद्यापासून मात्र भव्य राम मंदिरात रामभक्तांना दर्शन घेता येऊ शकते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली असून त्यांच्या हस्ते आज मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे.

तब्बल पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य राम मंदिराचे निर्माण झाले असून हे मंदिर आता रानभक्तांना समर्पित करण्यात आले आहे. आता प्रभू श्रीरामललाचे दर्शन टेन्ट मध्ये नाही तर भव्य-दिव्य मंदिरात घेता येणार आहे.

यामुळे रामभक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात राममय वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे आज दिवसभर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विशेष चर्चा पाहायला मिळाल्यात. याशिवाय आज महाराष्ट्रात आणखी एका विषयावर खूपच चर्चा रंगल्या होत्या.

विषय म्हणजे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी काढलेला भव्य मोर्चा. जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईकडे निघाले आहेत. त्यांनी काढलेल्या या मोर्चात महाराष्ट्रातील हजारो नागरिक सहभाग घेत आहेत.

यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीत देखील बदल करावा लागत आहे. जरांगे पाटील यांच्या या मोर्चामुळे सरकार थोडेसे बॅक-फुटवर देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अयोध्या येथील भव्य-दिव्य राम मंदिरात जाऊन प्रभू रामरायाचे दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

खरेतर आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेला मराठ्यांचा मोर्चा अहमदनगर येथील भिंगार मध्ये पोहोचला तेव्हा त्यांनी तेथील राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राम मंदिरात आरती देखील केली. तसेच त्यांनी अयोध्या येथे तयार झालेल्या राम मंदिराचा आम्हाला खूप आनंद आहे असे म्हटले.

तसेच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार अशी घोषणा देखील केली आहे. त्यांनी आज मी प्रभू श्रीरामांना साखर देणार नाही मात्र उद्या त्यांच्याकडे साकडे घालणार असून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्याला जाऊन प्रभू श्री रामरायाचे दर्शन घेऊ असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी पाटील यांनी प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर तयार झाले, रामरायाचा खऱ्या अर्थाने वनवास मिटला, आता मराठा समाजाला देखील आरक्षण द्या आणि आमचा वनवास मिटवा असे सांगितले आहे. तसेच ओबीसी कोट्यातून मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळाले नाही तर सत्ताधाऱ्यांना वनवासात पाठवल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा देखील मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आहे.