ताज्या बातम्या

Mansukh Hiren Murder Case : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार, एनआयएकडून माहिती उघड

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबई : देशातील बडे उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटेलिया (Antelia) या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्यापासून तपासात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आहेत.

यामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली असून एनआयएकडून (NIA) मुंबई उच्च न्यायालयासमोर (Mumbai High Court) प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) हे मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या हत्ये मागचे मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे.

एनआयएकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर याबद्दलचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सचिन वाजे यांच्यासह पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांची देखील नावे समोर आली होती.

दरम्यान, अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्यानंतर कार ज्यांच्या मालकीची आहे ते मनसुख हिरेन काही दिवसांनी मृत आढळले होते.

यावेळी तपासाची चक्र फिरली आणि सचिन वाजे यांचं नाव समोर आलं. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक ट्विस्ट निर्माण झाले आहेत.

एनआयएने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटलं आहे की, कथित कट मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत रचण्यात आला होता. इथेच प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office