तर कारखानदार शेतकर्‍यांना जादा ऊसाचा दर सहज देऊ शकतात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-   उसाचे उत्पादन वाढले तर परिणामी साखरेचे उत्पादन वाढते. त्यामुळे साखर कारखान्यावर शिल्लक साखरेचा व्याजाचा बोजा दिवसेंदिवस वाढतो. यामुळे साखर कारखाने अडचणीत येण्याची भिती आहे.

अशी स्थिती वेळोवेळी साखर कारखान्यांवर येवु शकते. इथेनॉल निर्मिती आणि त्याचे उत्पादन वाढविणे हा यावर उपाय आहे, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. गेल्या दोन वर्षापासुन देशात व महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस पडला.

यावर्षी सुध्दा सरासरी एवढा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. शेतकर्‍यांना पाण्याची उपलब्धता असल्यास ऊस शेती करण्याकडे त्यांचा कल असतो.तसेच रास्त व किफायतशिर दर देण्याचे साखर कारखान्यावर कायदेशीर बंधन असल्याने ऊस लागवडीकडे शेतकरी वळतो.

पर्यायाने देशात महाराष्ट्रात ऊसाचे उत्पादन कमालीचे वाढते. दरम्यान साखर उत्पादन वाढल्याने केंद्र सरकारने 60 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला. साखर निर्यातीला अनुदानही दिले. त्यामुळे 58 लाख टन साखर निर्यातीचे करार ही झाले.

परंतु मध्यंतरीच्या साखर निर्यात अनुदानात केंद्र सरकारने कपात केली. त्याचा फारसा परिणाम साखर निर्यातीवर झाला नाही. इथेनॉल उत्पादन वाढले तर साखर उत्पादन कमी होवुन साखरेला भाव वाढेल.

तसेच इथेनॉलचे अतिरिक्त आर्थिक फायदा विचारत घेवून साखर कारखान्यांना ऊसाचा हमीभाव व इथॅनॉलमुळे झालेला अतिरिक्त नफा शेतकर्‍यांना जादा ऊसाचा दर देणे शक्य होईल. त्याचा फायदा शेतकर्‍यांना ऊसाच्या भावाच्या रुपाने होईल. कारखानेही व्यवस्थित चालतील.

अहमदनगर लाईव्ह 24