माणुसकी ओशाळली : रुग्णालयातून लांबवली मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-  नाशिक शहरातील एका रुग्णालयात माणुकीसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

मृत महिला रुग्णाच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची पोत चोरी झाल्याचा आरोप तिच्या मुलाने केला आहे. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाने तपासकामात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

नाशिक शहरामध्ये एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा वाढता आकडा मन हेलावून टाकणारा आणि धडकी भरवणारा असताना या कठीण प्रसंगात देखील मृताच्या टाळू वरचा लोणी खाण्याचा प्रकार काही रुग्णालय करत असल्याने हा प्रकार थांबवावा, अशी मागणी नाशिककर करत आहेत.

याबाबत गौरव शिंदे यांनी नाशिक शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्या आई कल्याण शिंदे यांची कोरोनामुळे तब्येत खालावली. त्यांना कुटुंबीयांनी राजीव गांधी भवन परिसरातील स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

उपचार सुरु असताना, त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मात्र, शिंदे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

ही बाब गौरव यांनी हॉस्पिटल प्रशासनाला सांगितली.हॉस्पिटल प्रशासनाने उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही तपासले.

मात्र, त्यातून चोरी गेलेली पोत सापडत नसल्याने गौरव ही फिर्याद दिली. हॉस्पिटलचे संचालक राजेश यादव म्हणाले, चोरीची घटना घडली असेल तर ती दुर्दैवी आहे.

मात्र, त्यातील दोषी सुटणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. पोलिसांना सर्व सहकार्य आहे अस हॉस्पिटलकडून सांगण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24