ताज्या बातम्या

Health Tips : स्वस्तात मिळणाऱ्या ‘या’ भाजीमुळे टाळता येतात अनेक आजार

Published by
Ahmednagarlive24 Office

Health Tips : थंडीच्या दिवसात बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या विकायला येत असतात. यामध्ये वाटाणा लोकप्रिय भाजी आहे. अनेकांना कच्चा वाटाणा खायला खूप आवडतो.

यामध्ये खूप पोषक तत्त्वे असतात हे अनेकांना हे माहीत नसतं. संशोधनातही वाटाणा खाणे फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पचन आणि हृदयासंबंधित अनेक आजार दूर होतात.

साखरेची पातळी नियंत्रणात राहते

संशोधकांच्या टीमला असे दिसून आले की मधुमेहाची समस्या कमी करण्यासाठी हिरव्या वाटाणा खाणे फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असतो, ज्यामुळे ते मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतात.

पाचन आरोग्यासाठी फायदेशीर

संशोधनानुसार, हिरव्या वाटण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे ते पचनासाठी फायदेशीर ठरते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांचा धोका कमी होऊन आतड्यांसंबंधी जळजळ, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) यांसारख्या पोटाच्या समस्यांमध्ये वाटाणा फायदेशीर असतो.

हृदयासाठी फायदेशीर

वाटण्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे घटक असतात त्यामुळे हृदय निरोगी ठेवले जाते आणि संबंधित रोगांचा धोका कमी होतो त्याशिवाय या पोषक तत्वांनी युक्त आहार उच्च रक्तदाब रोखण्यासाठी फायदेशीर आहे.

कर्करोगाचा धोका कमी

वाटण्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आणि पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यासाठी आवश्यक असतात.

सॅपोनिन्स, वनस्पती संयुगे असतात ज्यांना अँटीकार्सिनोजेनिक प्रभाव असतो. सॅपोनिन्स कर्करोगाच्या पेशींना रोखण्यासाठी आणि ट्यूमरची वाढ रोखण्यासाठी वाटाणा खाणे फायदेशीर आहे.

Ahmednagarlive24 Office