उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक (UP Assembly Election result 2022)जिंकत योगींनी पुन्हा सत्ता काबीज केली आहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणूकामध्ये भाजपने (BJP) मोठी आघाडी घेत चार राज्यात सत्ता राखली आहे.
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी रणशिंग फुंकले असून आज ४ वाजता योगींचा शपथविधी आहे. या शपथविधीला देशातल्या बड्या नेत्यांसह अनेक मंडळींनी निमंत्रणं दिली गेली आहेत.
योगी यांच्यासोबत कोणकोणते मंत्री शपथ घेणार याची उत्सुकता उत्तर प्रदेश जनतेला लागली आहे, मात्र या शपथविधीला अनेक नवीन चेहरे मंत्री होणार असून योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री असलेले श्रीकांत शर्मा (Srikanth Sharma) आणि सिद्धार्थनाथ सिंह (Siddharthanath Singh) मंत्री होणार नाहीत अशी माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अनेक मोठे चेहरे मंत्रिमंडळातून गायब होऊ शकतात. यामध्ये जलशक्ती मंत्री डॉ.महेंद्र सिंह, औद्योगिक विकास मंत्री सतीश महाना, ऊर्जा मंत्री श्रीकांत शर्मा, सिद्धार्थनाथ सिंह, जय प्रताप सिंह यांच्यासह अनेकांची नावे आहेत, जे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिसले नाहीत.
यासोबतच भाजप अल्पसंख्याक आघाडीचे सरचिटणीस दानिश आझाद यांना मोहसीन रझा यांची जागा मिळू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी दानिशशी संपर्क साधण्यात आला होता. ते सध्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. ब्रिजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार आहे. योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही केशव प्रसाद मौर्य उपमुख्यमंत्री होते. त्याचबरोबर या यादीत दिनेश शर्माच्या जागी ब्रजेश पाठकला स्थान मिळू शकते.
तसेच माजी मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी योगी सरकार 2.0 च्या मंत्रिमंडळात असू शकतात. शपथविधीसाठी त्यांना राजभवनातून निमंत्रण मिळाले आहे. जितिन प्रसाद आणि पंचायत राज मंत्री भूपेंद्र चौधरी यांचाही फोन आला आहे.
योगी सरकार 2.0 च्या मंत्रिमंडळात माजी मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनाही मंत्री केले जाऊ शकते. शपथविधीसाठी त्यांना राजभवनातून निमंत्रण मिळाले आहे.
जितिन प्रसाद आणि पंचायत राज मंत्री भूपेंद्र चौधरी यांचाही फोन आला आहे. गिरीश यादव आणि सतीश शर्माही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
यासोबतच नितीन अग्रवाल, संदीप सिंह आणि आशिष पटेल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. याशिवाय केंद्रीय मंत्री बीएल वर्मा मुख्यमंत्री निवासस्थानी उपस्थित आहेत.