‘या’ सरकारच्या काळात अनेक योजना बंद होत आहेत; मात्र भ्रष्टाचार जोरात सुरू आहे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- यांना’ वीजबिल वसुली बंद करा म्हटलं, तर थेट वीज बंद केली. वैधानिक विकास महामंडळं बंद केली. आमच्या सरकारने सुरू केलेल्या योजना बंद केल्या.

या सरकारमध्ये सर्व योजना बंद होत आहेत, पण भ्रष्टाचार मात्र जोरात सुरू आहे. मंत्रालयं बंद राहात आहेत, पण दुकानदारी जोरात सुरू आहे.

अशी खोचक टीका भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीपत्रकार परिषदेत महाविकासआघाडी सरकारवर केली आहे. पुढे त्या म्हणाल्या की, एखाद्या मंत्रालयात मुख्यमंत्रीपद, त्याखालोखाल गृहमंत्रीपद महत्त्वाचं आहे.

पण राज्यातले मंत्री स्वत:च भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले असतील, तर जनतेनं कुणाकडे बघायचं. कुणाकडून अपेक्षा ठेवायची. या सरकारकडून लोकांना आता अपेक्षा राहिल्या नाहीत.

येणाऱ्या निवडणुकीत लोक सरकारला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. एखाद्या संघटनेच्या सगळ्या मागण्या मान्य करता येत नाहीत.

पण त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. सरकारने चर्चेसाठी विलंब केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असल्याचे त्या म्हणाल्या.

Ahmednagarlive24 Office