अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुधवारी (ता.८) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात प्रवेश केला.
कोपरगाव शहराध्यक्ष सतीश काकडे यांच्या मार्गदर्शनाखालीखाली हॉटेक विरा पॅलेसमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष वसंत मोरे व नगरसेविका तथा पुणे शहराच्या महिला शहराध्यक्षा ऍड. रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धारणगाव,
सोनार वस्ती, संजयनगर, लक्ष्मीनगर, मोहनिराजनगर, बेट, गांधीनगर, खोपडी, गोधेगाव, कान्हेगाव वारी, धोत्रे, दहिगाव बोलका, देर्डे फाटा येथील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
तत्पूर्वी शहरात रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यामध्ये शहर व पंचक्रोशीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तर उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर, हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे, विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी, तालुकाध्यक्ष रोहित एरंडे, उपशहराध्यक्ष संजय जाधव, कामगार जिल्हाध्यक्ष नितीन त्रिभुवन,
विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी सपकाळ, वाहतूक तालुकाध्यक्ष जावेद शेख, शहराध्यक्ष सचिन खैरे, नवनाथ मोहिते मुकुंद काकडे, राजू जाधव, माणिक मोहिते, बल्ली पाटोळे, छोटू पठाण,
सागर महापुरे, जयेश जाधव, अनिकेत खैरे, महेश वारकरी, सुनील माळवदे, राज परदेशी, युवराज पवार, सुनील मोहिते, अनिल सुपेकर, पप्पू सोनवणे आदी मनसैनिक उपस्थित होते.