अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- छत्रपती राजश्री शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे व आरक्षणाचे जनक आहेत. मराठा समाजाला सर्वप्रथम त्यांनीच आरक्षण दिले.
मातीमध्ये राहणारा कष्टकरी शेतकरी हा प्रामुख्याने मराठाच आहे. शेती हा सतत तोट्यातील व्यवसाय आहे. त्यामुळे हा गरीब मराठा शेतकरी आर्थिक संकटात आहे.
त्यासाठी शिक्षण नोकरी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक करण दादा ससाणे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन भाऊ गुजर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात,
जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस माऊली मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय छल्लारे, अॅड. समिन बागवान,
विष्णुपंत खंडागळे, अॅड. सर्जेराव कापसे, सोमनाथ पाबळे, अर्जुन राऊत, अक्षय नाईक, आशिष धनवटे, सरबजीतसिंग चुग, प्रताप देवरे,
दीपक कदम, सतीश बोर्डे, राजेंद्र औताडे, रावसाहेब आल्हाट, अजय धाकतोडे, सनी मंडलिक, रितेश एडके, राजेश जोंधळे, राजू डुकरे, आकाश शेंडे, भय्या शाह आदी उपस्थित होते.