मराठा समाजाचं आंदोलन एक महिना पुढे ढकलले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत आहे. सरकारने त्यासाठी 21 दिवसांची वेळ मागितली आहे.

त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन एक महिना पुढे ढकण्यात आल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. नाशिक येथे पार पडलेल्या समन्वयकांच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

आम्ही मराठा समाजाचे पाच मूक आंदोलने जाहीर केली होती. कोल्हापूरनंतर नाशिकला आंदोलन झाले.

या दोन्ही आंदोलनाला अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. कोल्हापूरचे आंदोलन झाल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकार भेटायला तयार असल्याचे सांगितले आणि त्यानंतर आम्ही भेट घेतली.

जवळपास 3 तास चर्चा झाली. त्यानंतर सरकारने आमच्याकडे 21 दिवसांचा वेळ मागितला. म्हणून तो आम्ही दिला आहे, असं संभाजराजे यांनी सांगितलं. सरकारच्या वतीने येत्या गुरुवारी पुर्नविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे.

त्यामुळे आयोग स्थापन करू नका पण गृहपाठ तरी करा, असं संभाजीराजे यांनी म्हटलं. तसेच मूक आंदोलन स्थगित नसून या काळात आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये जात समन्वयकांशी चर्चा करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24