मराठा आरक्षण : रोहित पवार म्हणाले सत्ताधारी-विरोधकांनी राजकारण…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-  संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला.

यावरून राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत. याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार म्हणाले कि, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, त्यावर कोणीही राजकारण करू नये.

मराठा समाजातील युवावर्गाला काय मदत करता येईल याबाबत सत्ताधारी व विरोधकांना एकत्र बसून निर्णय घ्यावा. मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा या समाजाने उभा केलेला एक मोठा लढा आहे.

त्यामागे कुठल्याही प्रकारची राजकीय शक्ती नाही. तो एक समाजाचा प्रश्न आहे त्यामुळे या समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर चांगलेच झाले असते.

परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. या न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिलेला आहे.

पूर्वीच्या सरकारने जे विधी तज्ञ नेमलेले होते, तेच विधी तज्ञ याही सरकारने कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी याबाबत कुठल्या प्रकारचे राजकारण करू नये.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24