अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Krushi news : भारतात मोठ्या प्रमाणात फुल शेती (Flower farming) केली जात असते. फुल शेती तुलनेने कमी खर्चिक असल्याने शेतकऱ्यांसाठी ही फायदेशीर देखील ठरत आहे.
अनेक शेतकरी बांधव झेंडू या फुलाची लागवड (Marigold Flower Farming) करत असतात. राज्यात झेंडूची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.
सणासुदीच्या दिवसात झेंडूच्या फुलाला अधिक मागणी (Marigold Demand) असल्याने याची शेती शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायदेशीर ठरते.
आता आगामी काही दिवसात अक्षय तृतीयाचा पावन सण राज्यात साजरा होणार आहे यामुळे निश्चितच फुलांना अजूनच मागणी असणार आहे. याप्रमाणेच दसरा, दिवाळी या सणाला देखील झेंडूच्या फुलाला विशेष मागणी असते.
यामुळे आज आपण झेंडूच्या लागवडीविषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत जेणेकरून झेंडूची लागवड करून शेतकर्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येणे शक्य होईल.
झेंडूच्या फुलांचे प्रकार: झेंडूच्या फुलांचे 2 प्रकार असतात. एक फ्रेंच झेंडू असते आणि दुसरे आफ्रिकन झेंडू असते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की फ्रेंच झेंडुची झाडे खूप लहान असतात. आणि याचे फूलही अगदी लहान असते. आणि जे आफ्रिकन झेंडु असते त्यांची फुले खूप दाट आणि मोठी असतात.
ऐकलं का झेंडु शेती कोणत्याही हंगामात करतात कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, कोरड्या हवामानात झेंडूच्या फुलांची लागवड उन्हाळी हंगामात सर्वाधिक यशस्वी मानली जाते. मित्रांनो या फुलशेतीची सर्वात मोठे विशेषता म्हणजे या फुलाची लागवड तीनही हंगामात करता येते.
ज्या ठिकाणी तापमान सुमारे 15 ते 29 डिग्री सेल्सियस यादरम्यान असते अशा ठिकाणी झेंडूची शेती विशेष यशस्वी होते आणि शेतकऱ्यांना यातून चांगला फायदा मिळत असतो. मात्र यापेक्षा जास्त तापमान असल्यास झेंडूच्या झाडांचे नुकसान होऊ शकते.
बाकीच्या फुलशेतीच्या तुलनेत झेंडूच्या फुलाची लागवड करण्यासाठी खर्च खूपच कमी येतो आणि शेतकऱ्याला ते विकण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. असे सांगितले जाते की या शेतीत शेतकरी बांधव 25 ते 30 हजार रुपयांची सहज गुंतवणूक करून दोन लाखांची कमाई सहज करू शकतात.
झेंडू शेतीत यशस्वी होण्यासाठी पाणी व्यवस्थापन ठरते महत्वाचे मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, झेंडूची लागवड बियाणे वापरून केली जाते. ओल्या माती असलेल्या जमिनीत याची लागवड केली जाते.
याशिवाय झेंडूची शेती सुरु करायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की झेंडू लागवड केल्यानंतर वनस्पतीची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे ठरते.
पावसाळ्यात झाडाला 10 ते 15 दिवसात 1-2 वेळा पाणी द्यावे लागते मात्र हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांनी पाणी ठेवावे आणि उन्हाळ्यात दर 5 ते 7 दिवसांनी झाडांना पाणी द्यावे लागते.
मित्रांनो जर आपल्याला झेंडूची शेती करायची असेल तर आपण कृषी क्षेत्रातील एखाद्या जाणकार लोकांचा सल्ला घेऊन यांची शेती सुरू करू शकता आणि निश्चितच जास्तीत जास्त कमाई यातून आपण मिळवू शकता.