अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- चारचाकी घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी विवाहितेला घराबाहेर काढून तिचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह सासु सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी येथील पीडित महिलेचा १९९३ मध्ये नगर तालूक्यातील चिचोंडी पाटील येथील राजू किसन कांबळे याच्यासोबत विवाह झाला होता.
सुरवातीला काही काळ व्यवस्थित नांदवल्यानंतर आशा कांबळे यांनी चारचाकी घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपये आणावेत. यासाठी त्यांचे पती, सासू, सासरे यांनी वारंवार लाथा बुक्कयांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच त्यांना उपाशीपोटी ठेवुन त्यांचा शारिरिक व मानसिक छळ केला.
दरम्यान आशा कांबळे यांच्या माहेरच्या लोकांनी दिड लाख रूपये दिले. मात्र त्यानंतर ते आणखी पैशाची मागणी करू लागले. पैसे दिले नाही म्हणून त्यांना घरातून हाकलून देण्यात आले.
या सर्व त्रासाला कंटाळून आशा कांबळे यांनी २२ जुलै रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती- राजु किसन कांबळे, सासु- हौसाबाई किसन कांबळे, सासरे- किसन हरिभाउ कांबळे (सर्व रा. चिंचोडी पाटील, ता. नगर) या तिघां जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.