अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- विवाहितेला ‘माहेरून दीड लाख रुपये आण, नाही तर सासरी येऊ नको’, या मागणीसाठी मानसिक, शारीरिक, मारहाण, शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवल्याप्रकरणी पती, सासू, दिर, सासरा, मामे सासरे या सात जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विवाहितेने तक्रारीत म्हटले की, माझे लग्न १० मे १९ रोजी झाले. मात्र लग्न थोडक्यात झाले. त्यामुळे सासरच्यांनी लग्नामधील मोठा खर्च वाचला, असे सांगून इलेक्ट्रॉनिक दुकान टाकण्यासाठी ‘तू माहेरून तुझ्या आई- वडिलांकडून दीड लाख रुपये आण’
अशी मागणी करून माझा शारीरिक, मानसिक, शारिरीक छळ केला. याप्रकरणी पती रोहित हरिदास चांगुलपाई, सासू अलका हरिदास चांगुलपाई,
सासरे हरिदास पांडुरंग चांगुलपाई, दिर रंजित हरिदास चांगुलपाई, ऋषिकेश हरिदास चांगुलपाई (सर्व रा. हिंदुस्तान आवासा, पैठण रोड, नक्षत्रवाडी, औरंगाबाद) तसेच मामे सासरे विजय विष्णू भांड,
भरत विष्णू भांड (रा. धनगरवाडी, ता. नेवासा) यांच्या विरुद्ध सोनई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.