pTron : सिंगल चार्जमध्ये 60 तास चालणाऱ्या इयरबड्सची मार्केटमध्ये एंट्री, किंमत आहे फक्त…

pTron : भारतीय बाजारात सध्या अनेक इअरबड्स उपलब्ध आहे. सर्व इअरबड्समध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स मिळत आहेत. अशातच जर तुम्ही नवीन इअरबड्स खरेदी कारण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण बाजारात एक सिंगल चार्जमध्ये 60 तास चालणारा इयरबड्स येत आहे. याची किंमत फक्त 899 इतकी आहे. त्यामुळे स्वस्तात तुम्हाला हा इअरबड्स खरेदी करता येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वजन आहे खूप कमी

pTron BassPods P481 TWS हे आकर्षक डिझाइनसह आणि हलक्या वजनाचा आहे. त्यामुळे तो व्यवस्थित वापरता येतो. हा इअरबड्स 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्सने सुसज्ज असून शक्तिशाली बास आणि स्पष्ट आवाज देण्याचे वचन देतात. त्याशिवाय हा इअरबड्स ब्रँड्सच्या सिग्नेचर नॉईज कॅन्सलेशन तंत्रज्ञान आणि उच्च रिझोल्यूशन ऑडिओ क्षमतेसह येतात.

टच सेन्सिटिव्ह कंट्रोल्स

pTron च्या मते, हा इअरबडमध्ये प्रगत प्रोसेसर आहे . यामुळे आवाजाची गुणवत्ता वाढते. त्याचबरोबर हा इयरबड टच सेन्सिटिव्ह कंट्रोल्ससह मिळत आहे. त्यामुळे त्याचे प्लेबॅक संगीत नियंत्रित होते,कॉल रिजेक्ट किंवा घेता येतात, त्याशिवाय आवाज नियंत्रणात करता येतो.

899 रुपयांमध्ये खरेदी करता येणार

BassPods P481 TWS कॉम्पॅक्ट चार्जिंग केल्यानंतर 60 तास चालतो. त्याशिवाय फक्त 10 मिनिटांसाठी चार्ज करून, तुम्ही तो 240 मिनिटे चालवू शकता. pTron चा हा इयरबड काळ्या आणि पांढर्‍या रंगात उपलब्धअसून तो 899 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. हा 11 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.