अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-फळे पिकवण्यासाठी लागणारा एसी आणण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडील पती व सासू सासऱ्यासह एकूण आठ जणांवर विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी जामखेड माहेर असलेली एक विवाहित महिला ही लग्न झाल्यानंतर आपल्या नगर येथील माळीवाडा येथील पंचपीर चावडी भागात सासरी नांदत होती.
सासरकडील पती, सासु, सासरा,नणंद,भायाा, जाव व दिर (सर्व रा.माळीवाडा) यांनी फिर्यादी महिलेस तीच्या माहेरुन घर बांधणी करता दोन लाख रुपये घेऊन यावेत तसेच फळ पिकविण्याचा नवीन एसी खरेदी करण्यासाठी दहा लाख रुपये आण,
असे म्हणून तसेच तू येथे राहायचे नाही व हे घर सोडून दे असे म्हणून फिर्यादी महिलेस दम देऊन हाता बुक्क्यांनी व प्लॅस्टिकच्या खुर्चीने डोक्यात मारहाण केली व माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये नाही तर येथे राहू नको हे घर सोडून दे तसेच
तुझ्या नावावर असलेली जागा आमच्या नावावर कर असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केली तसेच सासरकडील लोकांनी फिर्यादीस शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करून व पैशाची मागणी करून घराबाहेर हाकलून दिले.
अशी फिर्याद पिडीत महिलेने जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. यावरून सासरकडील आठ जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोहेकॉ शिवाजी भोस हे करत आहेत.