चौदाव्या वर्षी लावले लग्न, आणि पंधराव्या वर्षी झाले असे काही कि माता-पित्यांसह पती व सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- लग्नानंतर पंधराव्या वर्षीच मुलीला गर्भधारणा होऊन तिच्यावर मातृत्व लादले गेले.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी पीडित मुलीच्या माता-पित्यांसह पती व सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि नगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे तिच्या माता-पित्यांनी मे २०२० मध्ये लग्न लावून दिले होते. तेव्हा तिचे वय चौदा वर्षे होते.

लग्नानंतर काही महिन्यांतच तिला गर्भधारणा झाली. या मुलीला तपासणीसाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.

यावेळी सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे तेथील डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले होते. दरम्यान सदर मुलीस पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे तिची नुकतीच प्रसूती झाली.

पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून आरोपींविरोधात अत्याचार, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24