लग्न पडले महागात… नवरदेवासह २५ वऱ्हाडींना कोरोनाची लागण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  राहुरी तालुक्यातील कणगर येथील एका लग्न सभारंभात नवरदेवासह २५ व्यक्ती बाधित निघाल्याने एकच खबळळ उडाली असून नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन सरपंच सर्जेराव घाडगे यांनी केले आहे.

राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील कणगर गावातील एका वस्तीवर दोन दिवसांपूर्वी लगाम सभारंभ पार लदल. नवरदेव व नवरीचे घर अवघे तिनशे फुटावर आहे. दोन्ही वऱ्हाडी मंडळी वस्तीवरील होते. लग्नानंतर हळद फेडण्याचा कार्यक्रम झाल्या नंतर नवरदेवास ञास जाणवू लागला.

नवरदेवास आधी खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. परंतू तेथिल डॉक्टरने कोरोणाची तपासणी करण्याचा सल्ला दिला. देवळाली प्रवरा येथील सहारा कोविड सेंटर मध्ये नवरदेवाची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यामध्ये तो कोरोना बाधित आढळून आल्याने नवरदेवाचे कलव्हरे व कलव्हरी यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन कलव्हरी बाधित निघाल्या त्यांना देवळाली येथील सहारा कोविड सेंटर मध्ये रवानगी करुन विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले.

नवरदेव नवरी व कलव्हरी बाधित आल्याने सरपंच सर्जेराव घाडगे यांनी प्रशासनाच्या मदतीने लग्न ठिकाणाच्या दोन्ही वस्तीवर कोरोणा रॅपिड टेस्ट कॅम्प भरवून लग्न सभारंभासाठी हजर असलेल्या सर्वांची तपासणी केली असता एकूण २२ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले असून त्यांना राहूरी कृषी विद्यापीठाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान सरपंच घाडगे यांनी सांगितले की, सदर बाधीत रूग्ण हे एका वस्तीवरील असून त्यांना उपचारासाठी दाखल केले असून गावातील नागरीकांनी घाबरून न जाता स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24