file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- पुणतांबा चांगदेवनगर येथील कावेरी रविंद्र सांबारे (वय ३२) ही महिला स्वतःच्या शेतात काम करीत असताना विषारी साप चावून मृत झाल्याने तिचा संसारच उघड्यावर आला आहे.

शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कावेरी आपल्या शेतात गवत काढण्याचे काम करीत होती. कामाच्या नादात तिचे खाली लक्ष नव्हते. विषारी सापाने तिच्या पायाला दंश केला.

तिच्या सोबत असलेल्या एका महिलेच्या ही बाब लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. नातेवाईकांनी तिला तत्काळ साखर कामगार रुग्णालयात उपचारसाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. तिला चावलेला साप अतिशय विषारी असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. कावेरी सांबारे यांच्या पश्चात पती रविंद्र, एक मुलगा, मुलगी, सासू सासरे, दीर, भावजयी असा परिवार आहे.