अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- पाण्यात पडलेल्या अनेकांचा जीव वाचवणारा मासे धरण्याच्या नादात पाय घसरुन पडल्याने गाळात रुतुन पडल्याने राहुरी फँक्टरी येथिल भानुदास निकाळजे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना राहुरी फँक्टरी येथिल डाँ.तनपुरे कारखान्याच्या पाण्याच्या टँक मध्ये घडली.
पट्टीचा पोहणारा भानुदास निकाळजे या तरुणाने आज पर्यंत अनेकांचे जीव वाचविले आहे.टँकच्या कडेला उभा राहुन मासे पकडण्याच्या नादात असताना अचानक तोल जावून तो पाण्यात पडला.तो बराचवेळ वर न आल्याने उपस्थित तरुणांनी शोध घेतला पण तो सापडला नाही.
हा तरुण गाळात रुतुन बसल्याने या तरुणाचा शोध घेणे अवघड झाले होते. राहुरी फँक्टरी येथिल डाँ.तनपुरे कारखान्याचे पाण्याचे टँक मध्ये मासे धरण्यासाठी बुधवारी दुपारी 4 वा. भानुदास निकाळजे (वय 35) गेला मासे धरण्यासाठी गेला होता.मासे धरण्याच्या नादात असताना अचानक पाय घसरुन पडला.
भानुदास टेलटॅंकमध्ये पडल्याचे दिसताच त्याची पत्नी व मुलाने एकच आक्रोश सुरू करून मदतीसाठी याचना करू लागले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली परंतु भानुदास याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे आले नाही.पाण्याच्या टँकमधील गाळाचा अंदाज न आल्याने भानुदास हा गाळात रुतुन राहिला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बऱ्याच वेळाने त्याचा शोध घेण्यास सुरवात केली.परंतू मृतदेह हाताला लागला नाही. त्याचा मृतदेह शोधण्यासाठी देवळाली प्रवरा नगर पालिकेचे अग्निशमन पथकास पाचारण करण्यात आले होते.
परंतू शोध लागला नाही. देवळाली प्रवरा येथिल तुकाराम पवार, नंदू बर्डे, सखाहरी बर्डे,अशोक बर्डे आदींनी गळ टाकून शोध घेतला. गळ जड लागल्या नंतर यातील दोघे पाण्यात उतरुन भानुदासचा मृतदेह वर काढला.
घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ, पो.हे.काँ.डि.के आव्हाड, पो.काँ.विठ्ठल राठोड, रोहित पालवे,शामद शेख आदींनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करुन साई प्रतिष्ठनच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठविण्यात आला.भानुदास निकाळजे यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.