अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी परिसरातील विवाहित तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना मंगळवार १७ ऑगस्ट रोजी राहाता येथे घडली.

शेटवाडी येथील वैभव शेटे(वय-२४ ) हा विवाहित तरुण राहाता येथे मित्राकडे कामानिमित्त गेला असता मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच मृत्यमुखी पावला.

वैभव हा दूध वितरक वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, सहा महिन्याची मुलगी असा परिवार आहे.

आज सकाळी वैभव याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर देवळाली प्रवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. या घटनेने देवळाली प्रवरा परिसरातील शेटवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24