दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याने प्रेयसी चांगलीच संतापली.रागाच्या भरात केले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- प्रेम प्रकरणातून माणसे कोणत्या थराला जातील हे काही सांगता येत नाही असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील जबलपूर घडला आहे.

लग्नाच्या चौथ्या दिवशी बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह २४ मे रोजी घरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या हरगडच्या जंगलात सापडला आहे.

सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करत पोलिसांनी या घटनेचा तपास केला. परंतु आता या प्रकरणात वेगळीच माहिती समोर आल्याने पोलिसही हैराण झालेत. या युवकानं प्रेयसीला दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं त्याचा जीव घेण्यात आला आहे.

या युवकाने सुसाईड केलं नव्हतं तर त्याची हत्या करण्यात आली आहे. या युवकाला संपवण्यामागे दुसऱ्या कोणाचा हात नसून त्याच्या प्रेयसीचा हात असल्याचं उघड झालं. प्रेयसीनं तिच्या बहिणीसोबत मिळून युवकाची हत्या केली.

हत्येमागे प्रेयसीनं जे काही सांगितले ते ऐकून पोलीस चक्रावले. मृत युवकानं प्रेयसीला लग्नाचं वचन दिलं होतं. परंतु त्याने लग्न न करता तिचा विश्वासघात केला.त्यानंतर या युवकाचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न झालं. त्यामुळे प्रेयसी चांगलीच संतापली.

रागाच्या भरात तिने प्रियकराचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १६ मे रोजी मृत सोनू पटेल याला शेवटचं भेटण्यासाठी प्रेयसीनं त्याला हरगडच्या जंगलात भेटायला बोलावलं. त्याठिकाणी काहीतरी अँडव्हेंचर करण्याच्या बहाण्याने तिने सोनूचे हात-पाय आणि तोंड बांधले.

त्यानंतर त्याला उलटं करून त्याचं डोकं आणि चेहरा दगडाने ठेचून त्याची निर्घुण हत्या केली. या युवकाची हत्या झाल्याची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांना आरोपीचा शोध सुरू केला. त्यावेळी मृतकाची पत्नीने नवऱ्याची मैत्रिण मधु हिने शेवटचं भेटण्यासाठी बोलावलं होतं अशी माहिती दिली.

त्यानंतर कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी प्रेयसी मधू आणि तिच्या बहिणीची सखोल चौकशी केली. तेव्हा या दोघींनी हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला.

अहमदनगर लाईव्ह 24