ताज्या बातम्या

Maruti Suzuki Ciaz : फक्त 1 लाखात खरेदी करता येणार मारुती सियाझ सेडान, पहा फीचर्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Maruti Suzuki Ciaz : मारुती सुझुकी भारतीय बाजारात सतत नवनवीन कार लाँच करत असते, काही दिवसांपूर्वीच या कंपनीने आपली प्रीमियम सेडान कार सियाझ अपडेट केली आहे. कंपनीची ही एक लांब रुंद लोकप्रिय लक्झरी सेडान कार आहे.

या कारची किंमत 9.20 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.35 लाख रुपयांपर्यंत आहे. जर तुमच्या बजेटबाहेर या कारची किंमत असेल तर काळजी करू नका तुम्ही ही कार आता फक्त 1 लाख रुपयात खरेदी करू शकता. शिवाय कंपनीने यात जबरदस्त फिचर दिली आहेत.

Maruti Suzuki Ciaz किंमत

कंपनीच्या या कारची किंमत 9.20 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.35 लाख रुपयांपर्यंत जाते. परंतु, आता तुम्ही ती 1 लाख रुपयांपर्यंतच्या डाऊन पेमेंटसह खरेदी करू शकता. प्रत्येक प्रकारासाठी EMI चे टेबल खाली दिले असून 10% डाउन पेमेंट रक्कम आणि 10% बँक व्याज दरासह 5 वर्षांचा सरासरी कार्यकाळ निवडला आहे. त्यामुळे आता कार घेताना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या तिन्ही गोष्टींमध्ये बदल करू शकता.

प्रकार ऑन रोड किंमत व्याज दर अवधि डाउन पेमेंट EMI
Sigma 10.27 लाख 10% 5 वर्ष 1 लाख 19,688 रुपये
Delta 10.96 लाख 10% 5 वर्ष 1.10 लाख 20,956 रुपये
Zeta 11.76 लाख 10% 5 वर्ष 1.18 लाख 22,487 रुपये
Alpha 12.67 लाख 10% 5 वर्ष 1.27 लाख 24,213 रुपये
Delta AT 12.72 लाख 10% 5 वर्ष 1.27 लाख 24,332 रुपये
S 12.79 लाख 10% 5 वर्ष 1.28 लाख 24,448 रुपये
Zeta AT 13.13 लाख 10% 5 वर्ष 1.31 लाख 25,105 रुपये
Alpha AT 14.03 लाख 10% 5 वर्ष 1.40 लाख 26,830 रुपये

 

जर तुम्हाला 2023 Ciaz कार खरेदी करायची असेल तर एंट्री-लेव्हल सिग्मा व्हेरियंटची ऑन-रोड (दिल्ली) किंमत रु. 10.27 लाख असणार आहे. जे टॉप व्हेरियंटसाठी 14.03 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल.

उदाहरणार्थ, समजा जर तुम्ही मारुती सुझुकी सेडानचे डेल्टा एटी प्रकार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची सध्या एक्स-शोरूम किंमत 11.04 लाख रुपये आहे. तर तुम्ही 12.72 लाख ऑन-रोड किमती (दिल्ली) पैकी 1.27 लाख रुपये डाउन पेमेंट म्हणून भरले तर, तुम्हाला 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला सुमारे 24,332 रुपये द्यावे लागणार आहेत.

Ahmednagarlive24 Office