Maruti Suzuki Fronx : कमी बजेटमध्ये कार खरेदी करायचीय? मारुतीची ही कार केवळ 50 हजार रुपयात करा खरेदी

Published by
Ahmednagarlive24 Office

Maruti Suzuki Fronx : अनेकांना मार्केटमध्ये लाँच होणाऱ्या शानदार फीचर्स असणाऱ्या कार खरेदी करण्याची इच्छा असते. परंतु या कार महाग असल्याने त्यांना खरेदी करणे अनेकांना शक्य होत नाही. जर तुम्हाला स्वस्तात कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. आता तुम्हाला अवघ्या 50 हजार रुपयात नवीन मारुती सुझुकी फ्रॉन्क्स खरेदी करता येईल. कसे ते जाणून घ्या.

किती आहे किंमत?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे Maruti Suzuki Frontex Sigma हे या SUV चे बेस मॉडेल असून ज्याची सुरुवातीची किंमत 7,46,500 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. तर ऑन रोड ही किंमत 8,37,661 रुपयांपर्यंत वाढत जाते.

फायनान्स प्लॅन

जर तुम्ही Maruti Suzuki Frontex Sigma बेस मॉडेल रोख पेमेंटद्वारे खरेदी करत असाल तर त्यासाठी 8.37 लाख रुपये लागतील. परंतु जर तुमचे कमी बजेट असेल तर काळजी करू नका. आता तुम्ही केवळ 50 हजार रुपयांचे सुलभ डाउन पेमेंट भरून ही SUV घरी नेऊ शकता.

फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, समजा तुमचे बजेट 50 हजार रुपये असेल, तर या आधारावर बँक तुम्हाला 9.8 टक्के वार्षिक व्याजदरासह 7,87,661 रुपयांचे कर्ज देईल.

तुम्हाला कर्जाची रक्कम मंजूर झाली की तुम्हाला मारुती सुझुकी फ्रॉन्क्सच्या बेस मॉडेलसाठी 50 हजार रुपये डाउन पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर, कर्जाची परतफेड करण्यासाठी, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 16,658 रुपये ईएमआय जमा करावा लागणार आहे. बँकेने विहित केलेला ५ वर्षांचा कालावधी इतका आहे हे लक्षात ठेवा.

इंजिन आणि मायलेज

कंपनीकडून Maruti Suzuki Frontex मध्ये, 4 सिलेंडर 1197cc इंजिन देण्यात आले आहे जे 6000 rpm वर 88.50 bhp पॉवर आणि 4400 rpm वर 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की या एसयूव्हीचे एक लीटर पेट्रोलवर 21.79 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office