ताज्या बातम्या

Maruti Suzuki Fronx : मस्तच! जबरदस्त मायलेज आणि स्टाइलिश लुकसह ‘या’ दिवशी बाजारात येणार मारुतीची नवीन कार

Maruti Suzuki Fronx : मारुती सुझुकी ही तिच्या जबरदस्त मायलेज देणाऱ्या कारमुळे ओळखली जाते. या कंपनीने काही काळातच मार्केटमध्ये आपला जम बसवला आहे. कंपनी सतत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि इतर वाहन उत्पादक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवनवीन कार्स लाँच करत असते.

अशातच आता ही कंपनी स्टाइलिश लुकसह आणखी एक कार सादर करणार आहे. स्टाइलिश लुक आणि जबरदस्त मायलेजमुळे ही कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालेल हे नक्की. कंपनी लवकरच Maruti Suzuki Fronx ही शानदार कार लाँच करणार आहे.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स

नवीन Marut Franks च्या कारबद्दल बोलायचे झाले तर, या कारची लांबी सुमारे 3995 मिमी, रुंदी 1550 मिमी आणि उंची 1765 मिमी इतकी असणार आहे. तसेच ही कार एक दोन नव्हे तर 9 वेगवेगळ्या रंगांमध्ये बाजारात दाखल होणार आहे.

जाणून घ्या कारची वैशिष्ट्ये

तुम्हाला या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देखील पाहायला मिळणार आहेत. यात कंपनीचे हवामान नियंत्रण, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, कीलेस एंट्री, ड्युअल-टोन इंटिरियर्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो कारप्ले कनेक्टिव्हिटी, रीअर व्ह्यू कॅमेरा, पॉवर्ड विंडो, 7.0-इंच स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, 6-स्पीकर साउंड सिस्टम यांचा समावेश असणार आहे.

कसे असेल इंजिन?

कंपनी या कारमध्ये पॉवरफुल इंजिनही देत आहे. यात नवीन 1.0 लिटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन पाहायला मिळणार आहे. तसेच, यात 1.2 लीटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. ही इंजिने 5 आणि 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडली जाणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही कार टाटा पंचलाही थेट टक्कर देण्याची शक्यता आहे. कंपनीची ही नवीन कार तुम्हाला 12 ते 18 किमीचे शानदार मायलेज देऊ शकते.

किती आहे मारुती सुझुकी फ्रॉन्क्सची किंमत?

किमतीबद्दल विचार करायचा झाला तर कंपनीने सध्या या कारची किंमत जाहीर केली नाही. परंतु असे मानले जात आहे की कंपनी याला बाजारात 10 ते 12 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉन्च करण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts