Maruti Suzuki : ग्राहकांना धक्का ! ‘त्या’ प्रकरणात मारुती सुझुकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; आता मोजावे लागणार जास्त पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki  : भारताची सर्वात मोठी आणि लोकप्रिय ऑटो कंपनी मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नवीन वर्षात ग्राहकांना मारुती सुझुकीच्या कार्स खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

कंपनीने आपल्या कार्सच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती आपल्या कार्सवर बंपर डिस्काउंट देखील देत आहे. हा डिस्काउंट ऑफर तुम्हाला डिसेंबर 2022 पर्यंत मिळणार आहे.

कंपनी किमती वाढवणार  

मारुती सुझुकी देखील इतर कार उत्पादकांप्रमाणे आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. अशा परिस्थितीत लवकरच नवीन मारुती सुझुकी कार खरेदी करणे तुमच्या खिशाला पूर्वीपेक्षा जास्त फटका बसणार आहे.

कंपनी दर का वाढवत आहे?

मारुती सुझुकीच्या वाहनांच्या किमती वाढण्याचे कारण म्हणजे वाढती महागाई. वाढत्या महागाईमुळे वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली असून, त्यामुळे कारचा उत्पादन खर्चही वाढला आहे. याच कारणामुळे कंपनीने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मारुती सुझुकीची वाहने किती महाग होतील?

मारुती सुझुकीच्या विविध मॉडेल्स आणि व्हेरियंटच्या किमतींमध्येही फरक असेल. मात्र, वाढलेल्या किमती किती असतील, याची माहिती कंपनीकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

नवीन किंमत कधी लागू होणार ?

मारुती सुझुकी 1 जानेवारी 2023 पासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने ही माहिती दिली. अशा परिस्थितीत नवीन वर्षापासून मारुती सुझुकीची वाहने खरेदी करणे तुमच्या खिशाला अधिक फटका बसणार आहे.

हे पण वाचा :- Online Scam :  धक्कादायक ! एक क्लीक अन् खात्यातून गायब झाले तब्बल 37 लाख रुपये ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण