‘या’ तारखेला होणार Maruti Suzuki ची पहिली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या फीचर्स व इतर माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या वाहन क्षेत्रामध्ये Maruti ही कंपनी आघाडीवरची कंपनी आहे. मागील ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर Maruti ही सर्वाधिक वाहने विकणारी कंपनी ठरली आहे. लोकांची वाहने खरेदी करताना पहिली पसंती ही, Maruti ला असल्याचे दिसते.

दरम्यान आता Maruti Suzuki ही आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही eVX लवकरच बाजारात आणणार आहे. ती सध्या ऑनरोड टेस्टिंग करताना दिसली आहे. हेवी कॅम्फ्लायसह चाचणी घेण्यात येत असलेली ही इलेक्ट्रिक कार त्याच्या कॉन्सेप्ट व्हर्जनसारखीच दिसत आहे. चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात –

सध्या इलेक्ट्रिक वाहनांची डिमांड वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळले आहेत. त्यामुळे मारूतीनेही आता जबरदस्त कार तयार केली आहे. ही कार सर्वप्रथम ऑटो एक्स्पो 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. त्यातंर या कारविषयी चर्चा सुरु झाल्या. आता पुन्हा एकदा गुरुग्राममध्ये टेस्टिंगदरम्यान या मॉडेलचे दर्शन झाले आहे. आता ही कार साधारण 2025 मध्ये लॉन्च होऊ शकते असा खुलासा MSIL ने केला आहे.

Maruti Suzuki eVX मध्ये काय काय असेल खास ? :- ईव्हीएक्स मध्ये साधारण 60 kWh बॅटरी पॅक असेल आणि इलेक्ट्रिक मोटर चा सपोर्ट असेल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान या किती पॉवर असेल याबाबतचे आकडे अद्याप माहित नसले तरी कंपनीने दावा केला आहे की बॅटरी पॅक फुल चार्जवर 550 किमीपर्यंत रेंज देईल. ईव्हीएक्स टोयोटाच्या BEVs साठी डिझाइन केलेल्या 40 पीएल प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जे बॅटरी फ्लोअरबोर्डमध्ये समाकलित करेल. त्यामुळे केबिन आणखी मोठी होईल व प्रवाशांसाठी जागा वाढेल.

किंमत  :-  याची किंमत किती असेल याबाबत लवकरच माहिती समोर येईल परंतु असे म्हटले जात आहे की, या कार ची किंमत कमी असेल. याचे कारण असे की सध्या या इलेक्ट्रिक मध्ये टाटा मोटर्सचे वर्चस्व आहे. व या कंपनीला टक्कर देण्यासाठी मारुती योजना आखत आहे. त्यामुळे आता या कारची किंमत या चारपेक्षा कमी असेल असे म्हटले जात आहे.