अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- पुण्याच्या उत्तमनगर भागातील कोपरे गावात शनिवारी रात्री साडेअकरा वाजल्याच्या दरम्यान एक भीषण घटना घडली. कोपरे गावातील एका बसच्या गोडाउनला भीषण आग लागली.
या आगीत जवळपास 14 बसेस जळून पूर्णपणे खाक झाल्या आहेत. अग्नीशमन दलाला या आगीची माहिती मिळताच पुण्यातील अग्नीशामन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
यानंतर आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं. रात्री दोनच्या सुमारास ही आग विझवण्यात यश आलं आहे. या आगीत या गोडाऊनमध्ये काम करणारे दोन सख्खे भाऊ या आगीत जखमी झाले आहेत.
जखमींवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडाउनमध्ये बसची दुरुस्ती आणि पेंटींगचं काम चालायचं. काल रात्री इथे अचानक आग लागली आणि ती दोन-तीन बसपर्यंत पसरली.
आगीने भीषण रुप घेतल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने या गोडाउनमधील बस सुरक्षित स्थळी आणण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत रात्री २ वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं.