मायेचे छत्र हरपलेल्या बालकांच्या संरक्षणासाठी टास्क फोर्स गठित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक जणांनी आपले प्राण देखील गमवाल आहे. यातच काही ठिकाणी अक्षरश कुटुंबे उद्धवस्त झाली.

तसेच काही ठिकाणी माता- पिता गमावलेले बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट् शासनाच्या ७ मे २०२१ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये अहमदनगर जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सबाबत सोमवारी बैठक झाली. जिल्ह्यात कोविड-१९मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे काळजी व संरक्षणाची

तसेच दोन्ही पालक कोविड-१९ संसर्गामुळे दवाखान्यात असणाऱ्या पालकांची माहिती व त्यांच्या ० ते १८ वर्ष वय असणाऱ्या बालकांची माहिती प्रत्येक आठवड्याला जिल्हा कृती दलाचे समन्वयक वैभव देशमुख यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिल्या.

तसेच ० ते ६ वर्षांच्या बालकांना दत्तक विधान संस्थेत व ६ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना बालगृहात निवारा देण्याची उपाययोजना बालकल्याण समितीमार्फत करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24