‘या’तालुक्यात पंचायत समितीच्या सभापतीसह नगराध्यक्षाचाही राजीनामा!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  खासदार प्रितम मुंडे यांना मंत्रीपद नाकारल्याने पाथर्डी-शेवगाव च्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांच्या भावना तीव्र आहेत.

पाथर्डी येथील पंचायत समितीच्या सभापती व नगराध्यक्षासह अनेकांनी आपले राजीनामे दिले आहेत.

पंकजा मुंडे यांना पक्षातुनच विरोध होत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाला याबाबत कळविणार आहे. कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या आदेशाकडे लक्ष द्यावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले.

खासदार प्रितम मुंडे यांना मंत्रीपदाची संधी दिली नाही, म्हणुन नाराज झालेल्या पाथर्डीतील पंचवीस पदाधिका-यांनी पदाचे सामुहीक राजीनामे रविवारी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे दिले.

त्यानंतर मुंडे म्हणाले,  पंचायत समितीच्या सभापती सुनिता दौंड, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,

धनंजय बडे यांच्यासह पंचवीस पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. कार्यकर्ते व पदाधिकारी यांची नाराजी उघड झाली आहे. अजुनही राजीनामे सुरुच आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24