अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारातील बांबळेवाडी परिसरात गोवंश जनावरांच्या मांसाची वाहतूक करणार्या पिकअपने ट्रकला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पिकअप (एमएच ४७ ई २७६०) चालक गोमांस घेऊन पुण्याच्या दिशेने जात होता. डोळसणेत पिकअप टाटा ट्र्कला (एमएच १२ एनएक्स ६६७३) पाठीमागून धडकला.
या अपघातात पिकअप महामार्गावर पलटी झाला. यामध्ये असलेले गोमांस रस्त्यावर पडले. ७५ हजार रुपये किंमतीचे ७५० किलो गोमांस होते.
अपघात होताच पिकअप चालक पसार झाला. महामार्ग व घारगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन क्रेनने वाहन बाजूला केले. याबाबत बबन बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पिकअपच्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.