अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस,बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बीएससी नर्सिंग या पदवी वैद्यकीय परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा 10 ते 30 जून या कालावधीत घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी दिली.
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या 2 जून पासून सुरू होणार होत्या. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.अजित पाठक यांच्यासोबत बुधवारी मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.