Medicinal Plant Farming: देशातील शेतकरी बांधव आता शेतीतून (Farming) अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) मिळविण्यासाठी शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत. शेतकरी बांधव (Farmer) सध्या पारंपरिक पिकांऐवजी बागायती पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. बागायती पिकांबरोबरचं शेतकरी बांधव आता औषधी वनस्पतींची लागवड देखील मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.
औषधी वनस्पतींची शेती खरं पाहता कमी खर्चात सुरू होत असल्याने शेतकऱ्यांसाठी याची शेती अधिक फायदेशीर ठरत आहे. औषधी वनस्पतींची लागवड कमी खर्चात करता येणे शक्य असल्याने अल्पभूधारक शेतकरी आता मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळला आहे.
औषधी वनस्पतीमध्ये लेमन ग्रास या पिकाचा देखील समावेश आहे. लेमन ग्रास लागवड (Lemon grass farming) शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे कारण की, याची लागवड नापीक जमिनीत सुद्धा करता येणे शक्य आहे. शिवाय नापिक जमिनीत जरी याची लागवड केली तरी देखील यापासून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे.
या औषधी वनस्पतीच्या लागवडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या पिकाला अतिशय कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते तसेच या पिकाला कीटकनाशक फवारण्याची देखील गरज नसते. याशिवाय जनावरे देखील हे गवत खात नाहीत, त्यामुळे ते खुल्या मैदानात सहज पिकवता येते.
तज्ज्ञांच्या मते, मराठवाडा, बुंदेलखंड आणि राजस्थानमधील दुष्काळी किंवा कमी पाणी असलेल्या भागात लेमन ग्रासची लागवड फायदेशीर ठरू शकते. निश्चितच राज्यातील अवर्षणग्रस्त भागात या पिकाची शेती मोठ्या प्रमाणात केले जाऊ शकते आणि शेतकऱ्यांना त्यातून चांगला नफा मिळू शकतो.
लेमन ग्रासची लागवड आणि खर्च
•दुष्काळी भागात याची लागवड शक्य असल्याने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी लेमन ग्रास लागवड केल्यास कमी पाण्यात आणि खर्चात त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. तज्ञांच्या मते लेमन ग्रास लागवडीसाठी सुरुवातीला खते आणि बियाणे मिळून 30,000-40,000 पर्यंत खर्च येतो.
•एक एकर जमिनीवर लागवडीसाठी सुमारे 10 किलो बियाणे लागते, त्याच वेळी याची रोपवाटिका 55-60 दिवसांत तयार होते.
•शेतकऱ्यांना हवे असल्यास ते प्रमाणित रोपवाटिकांमधूनही त्याची रोपे खरेदी करू शकतात.
•रोपवाटिका तयार केल्यानंतर लेमन ग्रास रोपांची पुनर्लावणी जून-जुलै महिन्यात केली जाते.
•लेमन ग्रास तयार होण्यासाठी पुनर्लावणीसाठी 70-80 दिवस लागतात, या पावसाळ्यात फक्त पावसाच्या पाण्याने सिंचन केले जाते.
•लेमन ग्रास पिकात वर्षभरात पाच ते सहा कटिंग्ज घेतल्यास पाने काढता येतात.
•एकदा लिंबू गवत ओसाड किंवा कमी सुपीक शेतात लावले की, त्याचे पीक पुढील 6 वर्षे भरपूर नफा देते.
•त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी, शेणखत आणि लाकडाची राख शेतात टाकण्याचा सल्ला दिला जातो.
•या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे लेमन ग्रास पिकाला वर्षभरात फक्त 2-3 खुरपणी आणि 8-10 सिंचन आवश्यक आहे.
प्रक्रिया केल्यास लाखोंचा फायदा होईल
आंतरराष्ट्रीय बाजारात लेमनग्रास आणि त्याच्या तेलाला खूप मागणी आहे. भारत हा लेमन ग्रास ऑइलचाही मोठा निर्यातदार देश आहे, आपल्या देशातून दरवर्षी सुमारे 700 टन लेमन ग्रास ऑइलची निर्यात होते, त्यामुळे त्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी सरकार शेतकऱ्यांना माफक दरात अनुदानही देत आहे.
एक एकर शेतात लेमन ग्रास लागवड केल्यास 150-200 टनांपर्यंत पानांचे उत्पादन मिळते, ज्यातून 100-150 टन तेल मिळते.
बाजारात लेमन ग्रास तेल 1200 ते 1300 रुपये लिटरने विकले जाते.
अशा प्रकारे लेमन ग्रासची लागवड करून वर्षभरात 1 लाख 20 हजार ते दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.