रेल्वे,बँक, राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत देखील भरती प्रक्रियेच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नोकर भरतीची वाट पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
अगदी त्याच पद्धतीने आता भारतीय रेल्वे भरती बोर्ड अर्थात आरआरबी अंतर्गत जवळपास आठ हजार प्रवासी तिकीट परीक्षक म्हणजेच टीटीईच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत व त्यासोबत स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3712 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीचा लाभ घेणे गरजेचे आहे.
रेल्वे बोर्ड आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये मोठी भरती :- याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आरआरबी अंतर्गत 8000 प्रवासी तिकीट परीक्षक म्हणजेच टीटीई या पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एसएससी कडून तीन हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
रेल्वे भरती बोर्डाकडून प्रवासी तिकीट परीक्षक पदासाठी भरती :- भारतीय रेल्वे भरती बोर्डाच्या प्रवासी तिकीट परीक्षक पदासाठी परीक्षेची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नसली तरी याकरिता पात्र उमेदवारांना वेबसाईटवरून अर्ज करता येणार आहे व या भरतीची जर सविस्तर जाहिरात पहायची असेल तर तुम्ही www.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकतात.
या भरतीचे वेळापत्रक लवकरच जारी करण्यात येणार असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना याकरिता अर्ज करता येणार आहे. साधारणपणे जून महिन्यापर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत असणार आहे. या भरती करिता ज्या उमेदवारांनी वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेले आहेत ते युवक या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत.
तसेच वयाची अंतिम मर्यादा 28 आहे. या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना 27 हजार 400 ते 45 हजार 600 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे. साधारणपणे परीक्षा आणि तोंडी मुलाखत घेऊन या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना याकरिता अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. या भरतीमध्ये आधी लेखी परीक्षा, मग शारीरिक चाचणी त्यानंतर मेडिकल केले जाईल.
किती आहे अर्जासाठी फी? :- या भरतीकरिता अर्ज करताना सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवाराकडून पाचशे रुपये शुल्क आकारण्यात येणार असून त्यासोबत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 300 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मधील भरती करिता 7 मे पर्यंत करता येणार अर्ज रेल्वे व्यतिरिक्त स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एसएससीमध्ये देखील एकूण 3712 रिक्त पदे भरण्यात येणार असून
त्या पदांमध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, जूनियर सेक्रेटरियल असिस्टंट, जूनियर पर्सनल असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑफिसर इत्यादी पदांचा यामध्ये समावेश आहे. या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख सात मे असून उमेदवार ssc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकणार आहेत. यासाठीची परीक्षा ही जून- जुलैमध्ये होणार आहे.