अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर सात दिवसांनंतर वाकडी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
हिरण यांचा मृतदेह सापडून आज सहा दिवस उलटूनही पोलिसांना या दोन आरोपींव्यतिरिक्त हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 30 ते 40 जणांची चौकशी केली आहे.
दरम्यान हिरण हत्याकांडन प्रकरणी पोलिसांनी तातडीने कोणताही तपास केला नाही म्हणून पोलिसांविरुध्द नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
आरोपींचा शोध घेऊन अटक करावी अन्यथा मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय हिरण कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतला होता. यावर पोलिसांनी गुन्हेगारांना तातडीने पकडू असे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांसह ग्रामस्थ शांत झाले.
या हत्याकांड प्रकरणी सध्याच्या स्थितीला पोलिसांनी सागर गंगावणे व बिट्टू वायकर या दोघांना अटक केलेली आहे. वायकर व गंगावणे यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस यंत्रणा या हत्याकांडाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. आतापर्यंत पोलिसांनी 30 ते 40 जणांची चौकशी केली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी दिली. दरम्यान या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे