अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- जागरूक नागरिक मंचातर्फे पत्रकार चौकातील शहीद भगतसिंग उद्यानात व्हॅलेंटाइन डे निमित्त सर्वांनी देशावर प्रेम व्यक्त करत जातीयवाद नष्ट करू हा संदेश देण्यासाठी आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला.
यावेळी शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रा. सुनील पंडित, हरजितसिंग वधवा, अर्शद शेख व डेव्हिड चांदेकर यांना यांना एकाच मंचावर बोलावून त्यांच्या हाती तिरंगा देऊन गुलाबपुष्प देत सन्मानित करण्यात आले. मुळे म्हणाले, व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी प्रेम व्यक्त करायचेच असेल तर आपल्या देशावर प्रेम व्यक्त करा.
सध्या जातीयवादाच्या किडीने संपूर्ण देशाला पोखरले आहे. राजकीय पक्ष व त्यांचे पुढारी या किडीला खतपाणी घालत जातीयवादचा रोग पसरवत जाती धर्मात फुट पडून राज्य करत आहे. याला आपण छेद दिला पाहिजे. प्रा.सुनील पंडित, अर्शद शेख यांनी चांगला संदेश देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांनी एक राहण्याचे आवाहन केले.
यावेळी जागरूक नागरिक मंचचे सुरेखा सांगळे, शारदा होशिंग, मेहरुदा शेख, प्रा.मंगेश जोशी, अभय गुंदेचा, कैलास दळवी, भैरवनाथ खंडागळे, बाळासाहेब भुजबळ, बी.यू.कुलकर्णी, योगेश गणगले, सुनील कुलकर्णी, जय मुनोत, अमेय मुळे, प्रसाद कुकडे, राजेश सटाणकर, प्रकाश भंडारे आदी उपस्थित होते.