अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- येत्या काही दिवसात नागरिकांना उन्हाळ्यापासून थोडा दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे. येत्या काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस तापमान 40 डिग्रीच्या खाली राहील, असा अंदाज आहे. आज (मंगळवार) पहाटे साडेपाच वाजता दिल्लीतील सफदरजंग वेधशाळेतील तापमान 20.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहील. आज (मंगळवार) ताशी 35 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने कमाल तपमान सुमारे 38 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल.
त्याचबरोबर हवामान खात्याने आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
या ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.