दुधाला किमान ३५ रुपये दर द्यावा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-   दुधाला किमान ३५ रुपये दर द्यावा, तसेच दूध क्षेत्रातील लूटमार थांबवून एफआरपी व रेव्हेन्यू शेअरींग चे धोरण लागू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभा संघर्ष करत आहे.

यापार्श्वभूमीवर किसान सभेने पुन्हा एकदा दूध उत्पादकांच्या मागण्या धसास लावण्यासाठी जोरदार अभियान सुरू केले आहे.

दूध उत्पादकांच्या मागण्या अधिवेशनात मांडाव्या यासाठी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभरातील सर्व आमदारांना दूध उत्पादकांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.

ठिकठिकाणी आमदारांना भेटून, हे निवेदन प्रत्यक्षात देण्यात येत आहे. आमदार विनोद निकोले यांच्यामार्फत राज्यातील सर्व मंत्री,

सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांना प्रत्यक्ष भेटून दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींनी दूध उत्पादकांच्या मागण्या समजून, त्या सभागृहात मांडाव्यात.

अहमदनगर लाईव्ह 24