अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील अधोरेवाडी येथील गहिनीनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ व सचिव यांनी संस्थेत संगमताने तब्बल ३४ लाख ७७ हजार ३३३ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर अाला अाहे.
याप्रकरणी लेखा परिक्षक महेंद्र काशिनाथ गवळी यांच्या फिर्यादीवरून तब्बल १२ जणांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
संबधीत अपहाराबाबत गुन्हा दाखल करणे साठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदे यांनी परवानगी दिली आहे. त्याुनसार उत्तम रामचंद्र अधोरे (संस्थेचे कर्जदार व संचालक), शकुंतला उत्तम अधोरे,
योगेश उत्तम अधोरे, महमद रफीक सय्यद (कर्जदार व संस्थेचा सचिव), अलका अजिनाथ पारे (कर्जदार), अजिनाथ ज्ञानदेव पारे (कर्जदार), मछिंद्र रामचंद्र अधोरे चेअरमन,
परशुराम शिवराम लकडे (उपाध्यक्ष), मछिंद्र लक्ष्मण काळे (संचालक), गोरक्ष अंकुश लकडे (संचालक), दिगंबर कृष्णा येडे (संचालक), शिवाजी छगन मोटे (बँक इनस्पेक्टर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.