मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले भाजपवाले आता लपून का बसले?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  साडेसात वर्षात देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे, रोजगार वाढले नाही व महागाई वाढली असल्याने हे केंद्रातील भाजप सरकारचे अपयश आहे.

त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची क्षमायाचना केली पाहिजे व साडेसात वर्षात चांगले काही करू शकलो नसल्याची कबुली दिली पाहिजे, अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे केली.

युपीएच्या काळात दरवाढ झाली तर आंदोलन करणारे भाजपवाले आता कोठे लपून बसले, असा सवालही थोरातांनी केला. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यातील दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून जात असून,

दुसरीकडे अन्य महागाईने सर्वसामान्यांचे जीवनही कठीण झाले आहे. काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तर तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी बैलगाडीतून आले होते.

आज त्यांच्या सरकारच्या काळातील दरवाढ पाहून त्यांच्या आत्म्यास दुःख होत असेल. देवेंद्र फडणवीस यांचे सर्वच खरे मानले तर अवघड होईल व आमच्यावेळी मोर्चा काढणारे ते आता का लपून बसले, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24