मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना भाजप महिला मोर्चाच्या आक्रमक भूमिकेमुळे राजीनामा द्यावा लागला.

करुणा शर्माप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी केली. डॉ. भानुदास जी. डेरे इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित बूथ रचना कार्यकारिणी निवड बैठकीत त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या. धनश्री विखे, महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीपाली मोकाशी, सचिव अ‍ॅड. वर्षा डहाळे, सुरेखा विद्ये, शैला मुळक, राजेंद्र गोंदकर, नितीन दिनकर, सोनाली नाईकवाडी यावेळी उपस्थित होत्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24