अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- मंत्री शंकरराव गडाख यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या सूचनेनुसार शनीशिंगणापूर येथे कोविड केअर सेंटर चालू होणार आहे.
गतवर्षी सुविधा असणारे शिंगणापूरच्या सेंटरमध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक रुग्ण यात होते. शिंगणापूर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, जिल्हा परिषदेचे सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली.
सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कसबे, विश्वस्त पोपटराव शेटे, अप्पासाहेब शेटे यांच्यासह देवस्थानचे विभाग प्रमुख उपस्थिती होते.
अध्यक्ष बानकर म्हणाले, मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी आम्ही हे सेंटर चालू करत असून देवस्थानच्या वाहानतळावरील भक्तनिवास येथे आम्ही हे सेंटर चालू करणार असून रुग्णांसाठी दोन्ही वेळेच्या भोजनाची व्यवस्था आम्ही करणार आहोत.
शनीशिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात काय करता येईल, याबाबत बैठकीत चर्चा झाली. देवस्थानच्या रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडर भेंडे येथील कोविड रुग्णालयात गेले आहे. ग्रामीण रुग्णालयात कोविडचे रुग्ण ठेवण्यासाठी काय काय करता येईल व तेथील उपाय योजनेबाबत बैठकीत चर्चा झाली.
मागील वर्षी सुमारे ५०० रुग्ण शिंगणापूरच्या सेंटरमध्ये होते. त्यावेळी रुग्णांना वाचनालय, मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले होते.
अनेकांनी शिंगणापूर देवस्थानच्या या कोविड केअर सेंटरचे कौतूक केले होते. सोनईमध्ये गुरुवारी एकाच वेळेस ६५ रुग्णांची अँटीजेन टेस्ट पॉजिटिव्ह आली.
सोनाईत अजूनही अनेक लोक बाहेर पडताना दिसून येते आहेत.