अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने ऑक्सिजन प्लांट उभा राहणार असून त्यादृष्टीने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या असल्याने
लवकरच नेवासे तालुक्यातील ऑक्सिजन पुरावठ्याबाबतचा मोठा गंभीर प्रश्न मंत्री गडाखांच्या प्रयत्नामुळे सुटणार आहे.
नेवास फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात होत असलेला ऑक्सिजन प्रकल्प हा तामिळनाडूमधील कोईमतुरची फॅरेडे ओझोन ही कपनी बनवणार असून सुमारे दीड कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पात दिवसाला सुमारे दीडशे टाक्या तयार होणार आहे.
दरम्यान, मंत्री शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असून यावर काय काय उपाय योजना करता येतील याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तालुक्यात शनीशिंगणापूर,
नेवासे फाटा ग्रामीण रुग्णालय तसेच अन्य काही ठिकाणी दवाखाने असून ऑक्सिजनची मोठी कमतरता जाणवत होती. यासाठी नवीन प्रकल्प होणे गरजेचे होते. शनी शिंगणापूर, भेंडे येथे मोठे कोविड सेंटर आहे.