अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यातील इतर मागास वर्ग समाजाबद्दल बेताल वक्तव्य करून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या समाजाचा अपमान केला आहे, तेव्हा महाविकास आघाडी शासनाने त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी कोपरगाव तालुका भाजपच्या वतीने नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांच्नाकडे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील ओबीसी विरोधी आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे व उदासीन भूमिकेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगित झालेले आहे.
ओबीसी समाजाचा संघर्षाचा कोणताही इतिहास नाही. त्यामुळे माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही, असे वक्तव्य करून समस्त ओबीसींचा अपमान केलेला आहे.
मंत्री आव्हाड यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी व महाविकास आघाडी शासनाने त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अन्यथा भाजप ओबीसी मोर्चा तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, डी. आर. काले, जगदीश मोरे, बाळासाहेब गाडेकर, दीपक राऊत, राहुल सुर्यवंशी, अंकुश कुऱ्हे, दिनकर बोंडखळ,
रविअण्णा पाठक, प्रदीपजी नवले, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक, सरचिटणीस दिपक चौधरी, सुशांत खैरे, राजेंद्र सोनवणे, बापु पवार, शेतकरी आघाडीचे सतिष रानोडे, गोपीनाथ गायकवाड,
अशोक लकारे, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष शंकर बिऱ्हाडे, भाजप अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष खालीकभाई कुरेशी, सागर राऊत आदी उपस्थित होते.