अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-मुदतवाढी संदर्भात जो न्याय राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यातील राहुरी बाजार समितीला सहकार खात्याने दिला तोच न्याय तनपुरे कारखान्यासाठी मिळावा.
तनपुरे कारखान्याला मुदतवाढ मिळाली तरच कारखाना सुरू करणे सोयीस्कर ठरणार असल्याचे प्रतिपादन खा.सुजय विखे यांनी केले. राहुरी येथील पांडुरंग लॉन्स येथे खासदार डॉ. सुजय विखे व यांच्या उपस्थितीत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला.
यावेळी खा.विखे बोलत होते. आम्ही कारखाना सक्षमपणे चालविला.एक रुपयांचा भ्रष्टाचार केला नाही. मागिल काळातील 12 कोटी रूपयांची थकीत रक्कम अदा केली.ज्यांनी एक टन ऊस कारखान्याला दिला नाही ते लोक आंदोलनाला पाठींबा देत आहे. आमची हरकत पाठींबा दिला पाहिजे.
पाठींबा देणाऱ्यांनी संचालक मंडळ स्थापन करून कारखाना चालवावा असे आवाहन खा.विखे यांनी केले. कामगारांनी सहकार्य केले तरच आम्हाला कारखान्याचा गळीत हंगामासाठी प्रयत्न करता येईल. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास गळीत हंगामाची तयारी करू.
अन्यथा आम्ही आमचा योग्य निर्णय सर्वांपुढे जाहिर करणार असल्याचे विखे म्हणाले. माजी मंत्री शिवाजी कर्डीले म्हणाले की, खासदार विखे यांनी कारखाना सुरू केला नसता तर कामगारांना काय मिळाले असते? त्यामुळे कामगारांनी सहकार्य करावे. खासदार डॉ. सुजय विखे यांनाच नेहमीच पाठबळ देणार असल्याचे कर्डीले म्हणाले.
कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांनी या आपली भूमिका मांडत खासदार डॉ. सुजय विखे यांनी कारखाना सुरू करावा अशी विनवणी केली.
याप्रसंगी तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भनगडे, कारखान्याचे आजा माजी संचालक, सभासद, शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.